धक्कादायक! अत्याचारानंतर तरुणीला रस्त्यावर निर्वस्त्र सोडलं;आरोपी ताब्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- नगर शहरातील बलात्कार प्रकरणामुळे शहर हादरलं आहे. कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका युवतीवर वाहनामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) पहाटे घडली.

धक्कादायक म्हणजे आरोपीने पीडित तरुणीला रस्त्यावरच सोडून दिले. तिच्यावर शिंगवे नाईक (ता. नगर) येथील माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेत उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी: अत्याचार झालेली युवती मुळची वर्धा जिल्ह्यातील असून ती मनोरुग्ण असल्याने वर्धा येथून निघून आली होती. तिचा संपर्क अभय कडू याच्याशी आला. कडू याने त्याच्या वाहनामध्ये बसून युवतीला पुणे येथे नेले.

यानंतर तो तिला घेऊन पुणे येथून नगरमध्ये सोमवारी पहाटे दाखल झाला. कल्याण रोडवरील रेल्वे ब्रीजजवळ कडू याने युवतीवर त्याच्या वाहनामध्ये अत्याचार केला.

धक्कादायक म्हणजे या युवतीला तेथेच सोडून तो निघून गेला होता.सोमवारी सकाळी नगर शहरातील चांदणी चौक येथे एक तरुणी निर्वस्त्र अवस्थेत धावत असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आली.

याबाबतची माहिती त्यांनी माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेला दिली. संस्थेच्या डॉ. सुचिता धामणे यांनी या तरुणीला एका रुग्णवाहिकेतून आपल्या संस्थेत नेले.

तिच्यावर त्याठिकाणी उपचार सुरू करण्यात आले. सोमवारी पीडित तरुणीला मानसिक धक्का बसल्याने ती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. काल सकाळी मात्र ती आरडाओरड करू लागली.

त्यावेळी डॉ. धामणे यांनी तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता सदर माहिती दिली. डॉ. सुचिता धामणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून,

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी अभय बाबूराव कडू (रा.आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) याला ताब्यात घेतले आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment