जिल्हापरिषदेतील इतक्या कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेमधील कर्मचार्‍यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 31 जुलैपर्यंत वर्ग ‘क’ व ‘ड’ कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत.

सध्या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून जिल्हा परिषदेत ऑनलाईन बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

त्यानुसार मंगळवारपासून जिल्हा परिषदेत बदल्यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बदलीस पात्र असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना जिल्हा मुख्यालयात न बोलावता

संबंधित गट विकास अधिकारी यांच्यासमोर बोलावून ऑनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत,

महिला बालकल्याण व प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी मिळून एकूण 73 जणांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या,

अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली आहे. बुधवारी ग्रामपंचायत विभागाअंतर्गत 4 ग्रामसेवकांच्या विनंती व 25 आपसी,

तर ग्रामविकास अधिकार्‍यांच्या 1 विनंती व 5 आपसी बदल्या करण्यात आल्या. पंचायत विस्तार अधिकारी यांची 1 प्रशासकीय, 1 विनंती व 2 आपसी बदल्या करण्यात आल्या.

याशिवाय सांख्यिकी विभागाच्या एका विस्तार अधिकार्‍यांची ऑनलाईन प्रशासकीय बदली करण्यात आली. महिला बालकल्याण विभागाअंतर्गत 16 पर्यवेक्षिकांच्या बदल्या झाल्या.

त्यात 5 प्रशासकीय, 10 विनंती व 1 आपसी बदलीचा समावेश आहे. सांख्यिकी विभागाच्या एका विस्तार अधिकार्‍यांची 1 प्रशासकीय तर 1 विनंती बदली करण्यात आली.

प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शिक्षण विस्तार अधिकारी यांची 1 प्रशासकीय 1 विनंती बदली झाली. तर एक केंद्रप्रमुख यांची प्रशासकीय व 8 विनंती बदल्या करण्यात आल्या.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment