श्रीरामपुरात 2 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

तालुक्यातील दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर नगर येथे उपचार घेत असलेल्या 60 वर्षीय व्यापार्‍यासह वॉर्ड नं. 6 परिसरातील एका 68 वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला आहे.

श्रीरामपूर तालुक्यात कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून काल पुन्हा नव्याने चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.आता तालुक्यात 143 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या झाली असून तालुक्यातील 90 अहवालाची प्रतिक्षा आहे.

काही दिवसापूर्वी शहरातील एका पक्षाच्या सेलचा 60 वर्षीय पदाधिकार्‍यास कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्यावर काही दिवस श्रीरामपुरातील संतलुक रुग्णालयात उपचार सुरु होते.

दुसर्‍या दिवशी त्यांच्या कुटुंबातील चौघांचेही कोरोना बाधित अहवाल आले. या पदाधिकार्‍यास पुढील उपचारासाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र उपचार सुुरु असताना काल पहाटे पावणे दोन वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वॉर्ड नं. 7 मधील बेलापूर रोड वेशीजवळ राहत असलेल्या 73 वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने

तिला खासगी रुग्णालयात उपचारसाठी नेले मात्र कोरोना टेस्ट केल्याशिवाय कोणत्याही दवाखान्यात दाखल करून घेतले जात नव्हते. त्यानंतर संबंधित महिलेची रॅपिड टेस्ट करण्यात आली.

ती पॉझिटिव्ह निघाल्याने सेंटलूक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी सदर महिलेला नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. श्रीरामपूर तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 5 वर जावून पोहोचला आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

 

Leave a Comment