Ahmednagar NewsAhmednagar North

75 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अकोले तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

तालुक्यातील केळी येथील 75 वर्षीय वृद्धाच्या रुपाने कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे. तालुक्यातील विरगाव येथील एक 12 वर्षाच्या मुलीचा कोरोना अहवाल काल पॅाझिटिव्ह आला आहे.

त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 74 झाली आहे. त्यापैकी 45 रुग्ण बरे झाले असून 3 मयत झाले आहेत. सध्या 29 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

सदर मयत 75 वर्षीय व्यक्ती मुंबई वरुन तालुक्यातील केळी (गोडेवाडी) या गावी आल्यानंतर त्रास जाणवू लागल्याने अहमदनगर येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता

त्याचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला होता. त्यानंतर तो नाशिक येथील शासकीय रूग्णालयात उपचार घेत होता. काल मध्यरात्री उपचारा दरम्यान सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

बुधवारी अकोले तालुक्यात दिवसभरात 7 रुग्ण बाधित आढळले होते. तर गुरुवारी सकाळीच अकोले शहरातील 6 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या २ हजार ७७१ झाली आहे. १ हजार ३८४ लोकांवर उपचार सुरु असून १ हजार ३३७ रुग्ण बरे झाले आहेत. तर ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button