BreakingCrimeMaharashtra

अहमदनगर ब्रेकींग : दोन मुलांसह पित्यास जलसमाधी !

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- नदीच्या पुरात एका 35 वर्षीय इसमासह त्याचा एक मुलगा व मुलगी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील अमृता नदीवरील पुलावर गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान मुलीचा मृतदेह व त्यांची मोटारसायकल आढळून आली असून बाप-लेकाचा अद्यापही शोध सुरु आहे. 

यासाठी बीड येथील फायरबिग्रेड पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून ते अमृता नदीवरील बंधार्‍यात शोध घेत आहेत. शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील कृष्णा बाळासाहेब घोरपडे (32 वर्षे) यांची गेवराई तालुक्यातील देवपिंप्री ही सासरवाडी आहे.

दरम्यान गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कृष्णा घोरपडे हे बालमटाकळी येथून त्यांचा मुलगा प्रथमेश (8 वर्षे) व वैष्णवी (6 वर्षे) या दोघांना घेऊन देवपिंप्री येथे मोटारसायकल वरुन निघाले होते. ते रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पौळाचीवाडी जवळ आले होते. तर गुरुवारी सायंकाळी 6 वाजल्यापासूच जोरदार पाऊस सुरु असल्याने अमृता नदीला पूर आला होता.

यावेळी पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णा घोरपडे हे मोटारसायकल व दोन मुलांसह पाण्यात वाहून गेले. दरम्यान शुक्रवारी सकाळी नातेवाईकांनी शोधकार्य सुरु केले असता अमृता नदीवरील बंधार्‍यात वैष्णवी चा मृतदेह व त्यांची मोटारसायकल आढळुन आला आहे.

तर नदी व पुराचे पाणी वाहत असल्याने कृष्णा व त्यांचा मुलगा प्रथमेश यांचा शोध घेण्यात ग्रामस्थ व नातेवाईकांना अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे गेवराईचे तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी बीड येथील फायरबिग्रेड पथकाला घटनास्थळी रवाना केले असून हे पथक अमृता नदीवरील बंधार्‍यात घोरपडे पिता पुत्रांचा शोध घेत आहे. घटनास्थळी नायब तहसीलदार अभय जोशी, मंडळ अधिकारी अंगद काशिद हे तळ ठोकून आहेत.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close