कोरोना ब्रेकिंग : आता ‘या’ ठिकाणी होणार घरोघरी कोरोना टेस्ट !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-वाढती कोरोना बाधितांची संख्या विचारात घेवून आरोग्य विभागाने शनिवारपासून पाथर्डी शहरात घरोघरी जावून ‘रॅपिड टेस्ट’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात प्रथमच धारावीच्या धर्तीवर मोठ्या प्रमाणात तपासण्या करण्यात येत असून, यासाठी तब्बत 25 पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिली.

पाथर्डी शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहरात लॉकडाऊन केल्यानंतरही कोरोना बाधित आढळून येत आहेत.

शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा शुन्यावर नेहण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने ‘धारावी’च्या धर्तीवर शहरातील प्रत्येक घरोघरी जावून ‘रॅपिड टेस्ट’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

घरोघरी तपासणी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 25 पथके तयार करण्यात आली आहेत.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment