Ahmednagar NewsAhmednagar NorthCorona Virus Marathi News

‘ह्या’ गावात कोरोना उद्रेकाची भीती

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. आता नेवासे तालुक्यातही अनेक रुग्ण सापडले आहेत.

तालुक्यातील सलाबतपूर,जळके, गिडेगाव येथे कोरोना रुग्ण आढळले आहेत. परंतु या पैकी सलाबतपूर गावात अचानक कोरोनाने शिरकाव केला असून 24 संक्रमित सापडले आहेत.

त्यामुळे खळबळ उडाली आहे. परंतु या ठिकाणी अनेक उपाययोजनांची आवश्यकता असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सलाबतपूर येथे करोना बाधिताच्या संपर्कातील नागरिकांची रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यास दिरंगाई होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

या बाधितांच्या संपर्कातील अनेकांची रॅपिड टेस्ट होणे गरजेचे आहे. मात्र गेल्या तीन दिवसापासून प्रशासन या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने जनतेमध्ये आश्यर्य व्यक्त होत आहे.

प्रशासनाने संपर्कातील व्यक्तिंचे विलगीकरण केलेले नाही. त्यामुळे गावात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button