पारनेर नगरसेवक फोडाफोडी नंतर अजित पवार व उद्धव ठाकरे यांची महत्वपूर्ण बैठक ; राज्यात आता ठाकरे-पवार पॅटर्न?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :-मुंबईत दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या हिरवळीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवे चर्चा झाली.

परंतु भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांनी एकत्रच राहायला हवं. यात दोन्ही पक्षांचं हित आहे. केवळ रायगड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीची एकजूट दिसायला हवी.

त्यासाठी आपसात समन्वय असला पाहिजे, असा या चर्चेतला सूर होता. या चर्चेतून भविष्यातील ‘ठाकरे-पवार पॅटर्न’ची पायाभरणी झाल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पारनेरमध्ये शिवसेना नगरसेवकांचा एक गट फुटून राष्ट्रवादीत गेला होता. परंतु याचे पडसाद राज्य पातळीवर उमटले.

यावेळी अजित पवार यांनी राजकीय परिपक्वता दाखवत तातडीने या सर्व नगरसेवकांची शिवसेनेत परत पाठवणी केली. आत पुन्हा रायगड पालकमंत्रीपदावरून वाद समोर आला.

अजित पवार यांनी या विषयाला पूर्णविराम देण्यासाठी थेट मुख्यंमंत्र्यांशी समोरासमोर चर्चा केली. खासदार सुनील तटकरे, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, कोकणातील शिवसेनेचे आमदार या बैठकीला उपस्थित होते.

साधारण अर्धा तास ही बैठक झाली. दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादीने एकत्र लढण्याच्या निर्णय घेतला असेल तर त्याने भाजपला काहीच फरक पडणार नाही. आमच्यामागे जनतेचा पाठिंबा आहे. जनताच सोक्षमोक्ष लावेल असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment