धक्कादायक : शिवसेनेच्या पदाधिकार्‍यावर बिबट्याचा हल्ला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- श्रीरामपूर येथील प्रवरा कालव्यानजिक असलेल्या उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने शिवसेनेचे नेते सदाशिव कराड यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

अशोकनगर फाटा परिसरातील रस्त्याने सायंकाळी कराड दुचाकीवर जात होते. कालव्यानजिक असलेल्या उसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला.

त्यात कराड जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने कालव्यातून झेप घेत धुम ठोकली. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव अशोकनगर फाटा परिसरातील रेल्वे चौकीसमोर पाटाच्याकडेला

नेहमीप्रमाणे रोडवरून वाहनांची वर्दळ सुरू होती यामध्ये अशोकनगर कारखाना येथून सदाशिव कराड हे आपल्या दुचाकी वाहनावरून जात असताना

पाटाच्याकडेला उसामधून बिबट्याने झेप घेत श्री. कराड यांच्यावर हल्ला करत हाताला चावा घेतला व शर्टची बाही पूर्ण फाडली. घटनेचे गांभीर्य ओळखत कराड यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे बिबट्याने तात्काळ तेथून उसाच्या दिशेने पाटातून झेप घेत पोबारा केला. वनविभागाचे कर्मचारी एस. एम. लांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना माहिती कळवली.

त्यानुसार नागरिकांना परिसरात पिंजरा बसविण्याचे आश्वासन देण्यात आले. परिसरात वारंवार होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अशोकनगरसह प्रवरानदी परिसरात परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याची दहशत कायम आहे. शेळ्या, मेंढ्या, पाळीव कुत्रे, कालवडी तसेच लहान बालकांवर सायंकाळच्या सुमारास बिबटे हल्ले चढवितात.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment