Ahmednagar NewsAhmednagar NorthPolitics

शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा भाजपकडून निषेध

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- संसदेत शपथ घेत असताना खासदार उदयनराजे भोसले ‘जय भवानी जय शिवाजी’ म्हटल्याबद्दल भाजपचे व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला म्हणून शिवसेनेने निषेध नोंदवला.

दुसरीकडे श्रीराम मंदिर निर्माणाने कोरोना जाईल का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारून रामभक्तांच्या भावना दुखावल्या म्हणून श्रीरामपूर भाजपने गुरुवारी आंदोलन केले.

‘जय श्रीराम’ लिहिलेली दहा हजार पत्रे पवार यांना पाठवण्यात येणार आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडदे, उपजिल्हाप्रमुख योगेश बोरुडे, युवासेना शहरप्रमुख निखिल पवार, किशोर फाजगे, सागर हरके,

शुभम ताके, रमेश घुले, संदीप जगधने, प्रतीक यादव, किशोर डांगे आदींनी नायडू यांचा निषेध करत आंदोलन केले. छत्रपती‌ंबद्दल काय भावना आहे,

हे त्यांनी विरोध करून दाखवून दिले. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हा देश घडला, त्यांच्या नावाची घोषणा देण्यास नायडू यांनी केलेला

विरोध अयोग्य असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. श्रीराम मंदिर उभारल्याने कोरोना जाईल का? या पवार यांच्या वक्तव्याचा भाजपने निषेध केला

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button