आता ‘हा’ परिसर कंटेनमेंट क्षेत्र म्हणून जाहीर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील विविध गावांत कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे.

आता लोणी खु. (प्रवरानगर) परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने याठिकाणी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत.

यात, लोणी खु. (प्रवरानगर) गावातील हॉटेल आशा, साईनाथ कार्यालय परिसर कंटेनमेंट क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. तसेच सदर क्षेत्रातील नागरिकांचे तसेच वाहनांचे आगमन व प्रस्थान तसेच वाहनांचे आवागमन प्रतिबंधित करण्यात आले

आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री इत्यादी दिनांक 06 ऑगस्ट, 2020 च्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

या क्षेत्रात नागरिक आणि वाहनांच्या ये-जा करण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कोअर एरिया प्रतिबंधीत करणे,

आत किंवा बाहेर जाण्याचा मार्ग बॅरिकेटींग करावा,अत्यावश्यक सेवा व तातडीची वैद्यकीय सेवा वगळता कोणत्याही प्रकारची ये-जा होणार नाही व सदर प्रतिबंधित क्षेत्रामधील व्यक्ती घर सोडून येऊ शकणार नाही,

प्रतिबंधित क्षेत्रात जाणार व्यक्ती तपासणी केल्याशिवाय आतमध्ये न सोडणे. प्रतिबंधीत क्षेत्रात जाणार्‍या/येणार्‍या व्यक्तींच्या दैनंदिन नोंदी ठेऊन साथरोड सर्वेक्षणामार्फत पाठपुरावा करण्यात यावा,

प्रतिबंधीत क्षेत्रात विशेष पथकाद्वारे आदेशापासून 14 दिवस पावेतो घरोघरी सर्वेक्षण करुन संशयित रुग्णांचा शोध घेणे, शासनाच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे संशयितांचे तपासणी नमुने घेणे, सर्वप्रकारच्या धार्मिक व सामुदायिक कार्यक्रमाला बंदी आदी गोष्टी प्रशासनाने कराव्यात असा उल्लेख करण्यात आला आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment