पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत सोमवारी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते निवेदन देणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :-  श्रीगोंदा व नगर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी समाधानी झाला असला तरी उभी पिके पाण्यात गेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. 

त्यामुळे पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी भाजप चे युवा नेते विक्रमसिंह पाचपुते सोमवार दि २७ रोजी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देणार असल्याची माहिती भाजप चे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली.

गेल्या दोन दिवसापासून श्रीगोंदा व नगर तालुक्यासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे या पावसाने बाजरी ,तूर ,मका ,उडीद, मुग, कांदा, कपाशी आदी पिकांसह फळबागा पाण्याखाली गेल्या आहेत.

श्रीगोंदा मंडळात विक्रमी १०९ मिलीमीटर पाऊस झाला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पिकांच्या बरोबर शेतीही वाहून गेली आहे.

त्यामुळे या पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी यासाठी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते हे सोमवारी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देणार आहे असे नागवडे म्हणाले.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment