Ahmednagar CityAhmednagar NewsBreaking

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ पोलीस निरीक्षकांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला फास आवळायला सुरुवात केली आहे. जवळपास अहमदनगर जिल्ह्यात ३००० लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

विविध शासकीय कार्यालयांत कोरोनाने एंट्री केल्यानंतर आता पोलीस यंत्रणेलादेखील कोरोनाने आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे.

आता शहर पोलीस दलातील एका सहायक पोलीस निरीक्षकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी या निरीक्षकाची पत्नी, मुलगा, मुलगी व मातोश्री यांना संसर्ग झाला होता.

काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एका निरीक्षकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सहायक निरीक्षकांच्या कुटुंबाने हजेरी लावली होती.

त्यांनतर त्यांचा कुटुंबीयांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सुरुवातीला निरीक्षकाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. दुसर्‍या चाचणीत मात्र त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

पोलिसांसाठी पोलीस मुख्यालयात सुरू केलेल्या स्वतंत्र कोविड सेंटरमध्ये या निरीक्षकांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पोलीस दलातील सहायक निरीक्षकांचा पोलीस ठाण्याशी संपर्क झाला नसल्याने ठाण्यातील इतरांना याचा काही धोका नसल्याचे समजते.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button