Ahmednagar NewsAhmednagar NorthCorona Virus Marathi News

कोरोना रूग्णांची संख्या वाढती असल्याने चिंतेचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत. संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत. आता राहुरी तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे.

राहाता व साकुरीत कोरोना रूग्णांची संख्या वाढती असल्याने चिंतेचे वातावरण पसरले असून राहात्यात तीन जण तर साकुरीत तीन असे सहा रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला

तर राहाता तालुक्यात एकूण 14 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. गेल्या आठ दिवसापासून साकुरी व राहाता दोन्ही शहरातील करोना बाधीत रूग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत चालली आहे.

तसेच सध्या कोरोनाच्या धास्तीने रूग्ण ऍडमिट करून घेतले जात नाही. यामुळे इतर आजारग्रस्त रूग्णांवर उपचार मिळण्यास अडचण निर्माण होत आहे.

राहाता ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांवर राहाता शहर व शिर्डी नगरपंचायत कोरोना रूग्णांची जबाबदारी असल्याने व रूग्ण वाढीचे प्रमाण अधिक असल्याने त्यांचीही दमछाक होत असून यामुळे सर्वसामान्य रूग्णांची मोठी पंचाईत होत आहे.

प्रशासनाने खासगी दवाखान्यांना रूग्ण दाखल करून उपचार करण्याची सक्ती करावी, अशी मागणी होत आहे. राहाता येथील एक तर शहरातील नवनाथनगर येथील दोन महिलांना कोरोना झाला.

साकुरी येथील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना शिर्डीच्या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले आहे.त्याचबरोबर तालुक्यातील लोणी खुर्द गावातील बाधित पोलीस

कर्मचार्‍याची पत्नी व मुलगा आणि चंद्रापूर येथील दोघे जण शनिवारी बाधित आढळून आले. जळगाव येथे एक रुग्ण आढळून आल्याने त्या परिसरातील वस्त्या कंटेनमेट झोनमधे टाकल्या आहे.

शिर्डीत दोघे, वाकडी गावातील गणेशनगर, जाधव वस्ती परिसर तसेच नांदुर्खी बु. येथेही रूग्ण सापडल्याने ग्रामीण भागातही कडक उपाययोजना राबवत तो परिसर राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी कंटेनमेंट क्षेत्र घोषित केले आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button