Ahmednagar NewsBreaking

सुट्ट्यांमुळे ऑगस्टमध्ये बँका राहतील खूप दिवस बंद; वाचा यादी…

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- ऑगस्ट महिना एका आठवड्यानंतर सुरू होतो आहे. ज्यांना बँकेच्या संदर्भात काही कामे असतील तर त्यांनी ती लवकर आटोपून घ्यावी.

याचे कारण असे की पुढच्या महिन्यात बँकांना खूप साऱ्या सुट्या आहेत. त्यामुळे बँका बराच दिवस बंद राहणार आहेत. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी दुकाने व कार्यालये बंद केली असली तरी बँका सातत्याने सुरू होत आहेत.

तथापि बँका सुरू व बंद करण्याच्या वेळेत थोडा बदल झाला आहे. परंतु बँक कर्मचारी संपूर्ण लॉकडाऊनमध्ये काम करताना दिसले. ऑगस्टमध्ये बँकांना अनेक सुट्ट्या आहेत.

ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन, कृष्णा जन्माष्टमी, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्दशी, मोहरम आणि हरतालिका आदींसह अनेक राष्ट्रीय आणि स्थानिक उत्सव आहेत.

या तारखांना बँकेला असेल सुट्टी – 2, 8, 9, 16, 22, 23, 29 आणि 30 ऑगस्ट ला शनिवार आणि रविवार असल्याने सुट्टी असेल. रक्षाबंधनमुळे 03 ऑगस्टला सुट्टी आहे, तर 11 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीमुळे स्थानिक सुट्टी आहे,

12 ऑगस्ट म्हणजे श्री कृष्ण जन्माष्टमीमुळे राजपत्रित सुट्टी असेल, तसेच 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाची सुट्टी, 21 ऑगस्ट तीज (हरितालिका) मुळे स्थानिक सुट्टी, 22 ऑगस्टला गणेश चतुर्थी निमित्त स्थानिक सुट्टी असेल.

तर 30 ऑगस्टला मोहरममुळे राजपत्रित सुट्टी आहे, तसेच 31 ऑगस्टला ओणमची स्थानिक सुट्टी असेल. आरबीआयच्या वेबसाइटनुसार बँकाच्या सुट्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बँक हॉलिडे लिस्टनुसार १ ऑगस्ट रोजी चंदीगड,

पणजी आणि गंगटोक वगळता जवळपास सर्वच शहरांमध्ये बँका बंद राहतील. बकरी ईदचा सण 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.

मरकजी चांद कमिटीचे मौलाना खालिद रशीद फरंगी महली आणि शिया चांद कमिटीचे अध्यक्ष यांच्या मते, मंगळवारी ईदुल अजहा चंद्र दिसला नाही. म्हणून, बकरी ईद सण 1 ऑगस्टला साजरा केला जाईल.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button