Ahmednagar NewsAhmednagar South

‘त्या’ पिता पुत्रांवर एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील अमृता नदीच्या पुरात वाहून गेलेले कृष्णा घोरपडे यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा प्रथमेश याचाही मृतदेह आज सापडला.

या पिता पुत्रांवर शोकाकुल वातावरणात एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील जोरदार पावसामुळे नदीला पूर आला आहे.

या नदीच्या पुरात कृष्णा घोरपडे व त्यांचा एक मुलगा व मुलगी वाहून गेल्याची दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील पौळाचीवाडी येथील अमृता नदीवरील पुलावर गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली होती.

या दुर्घटनेत घोरपडे व त्यांच्या दोन मुलांचा अंत झाला. यातील मुलगी वैष्णवी हीचा शुक्रवारी, घोरपडे यांचा काल सकाळी आणि मुलगा प्रथमेश याचा काल दुपारी मृतदेह सापडला.

चारच्या सुमारास बालमटाकळी येथे पिता पुत्रांवर एकाच चीत्तेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतदेह शोध मोहिमेसाठी चकलंबा पोलिस ठाण्याचे सपोनि. विजयकुमार देशमुख, पीएसआय पवार,

पीएसआय झिंझुर्डे यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि महसूल विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कृष्णा घोरपडे हे बालमटाकळी

येथून त्यांचा मुलगा प्रथमेश (8 वर्षे) व वैष्णवी (6 वर्षे) या दोघांना घेऊन देवपिंप्री येथे मोटारसायकल वरुन निघाले होते. ते रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पौळाचीवाडी जवळ आले होते.

तर गुरुवारी सायंकाळी 6 वाजल्यापासूच जोरदार पाऊस सुरु असल्याने अमृता नदीला पूर आला होता.यावेळी पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णा घोरपडे हे मोटारसायकल व दोन मुलांसह पाण्यात वाहून गेले होते.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button