अहमदनगर ब्रेकिंग :शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

Published on -

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :- बहिणीबरोबर गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका दहा वर्षीय मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना नगर तालुक्यातील देहरे येथे घडली.

आदेश रघुनाथ जगधने (वय 10) असे या चिमुरड्याने नाव आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास आदेश हा त्याच्या लहान बहिणीबरोबर गुरे चरण्यासाठी देव नदी परिसरात गेला होता.

त्यावेळी तो नदीत पडला. एका महिलेने ही घटना पहिल्यानंतर तिने आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. ग्रामस्थ येईपर्यंत आदेशचा मृत्यू झाला होता. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!