Ahmednagar NewsAhmednagar NorthCorona Virus Marathi News

राहुरी तालुक्यात एकाच दिवशी ७ रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :-राहुरी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांत रविवारी पुन्हा वाढ झाली असून रविवारी एकाच दिवशी ७ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने आजवरची कोरोना बाधितांच्या संख्येने पंचाहत्तरी गाठली आहे.

आठवडे भरापुर्वी शहरातील बिरोबानगर येथे आढळून आलेल्या रूग्णाच्या संपर्कातील आणखी एक रुग्णाचा अहवाल रविवारी पाॅझिटिव्ह आला.

वांबोरी, कात्रड येथे प्रत्येकी एक तसेच उंबरे येथे तीन रुग्ण बाधित अाढळले. राहुरी शहरात कोरोना बाधितांची संख्या आठवडेभरात ११ झाली.

आज कृषी विद्यापीठात उपचार घेऊन ८ रुग्ण घरी परतल्याने बाधित रुग्णांपैकी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ३० झाली. तर ४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button