अहमदनगर ब्रेकिंग : ३० जणांना कोरोनाची लागण, जाणून घ्या जिल्ह्यातील लेटेस्ट अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात ३० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. 

अहमदनगर शहरातील ४, भिंगारमध्ये १७, संगमनेर येथे ३, नगर तालुक्यात आणि श्रीगोंदा येथे प्रत्येकी २, पारनेर आणि शेवगावमध्ये प्रत्येकी १, असे एकूण ३० रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

यात नगर शहरातील हातमपुरा भागात ४, भिंगार १७ यात सदरबाजार १,सोनसळे गल्ली ३,पंचशील नगर ३,मोमीन गल्ली ३,डॉ. जैस्वाल हॉस्पिटल परिसर १,नेहरू कॉलनी ६असे रुग्ण आढळले.

तर नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावात २ रुग्ण आढळले.संगमनेर पंचायत समिती जवळ ३ , श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी या गावात २, शेवगाव तालुक्यातील अंतरवली खु. येथे १,पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्‍वरमध्ये एक असे एकूण ३० रुग्ण आढळुन आले आहेत.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment