इंदोरीकरांच्या समर्थनार्थ एकवटल्या ‘एवढ्या’ संघटना ; दिला ‘हा’ इशारा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- एका किर्तनात बोलताना इंदोरीकरांनी मुलगा-मुलगी जन्मासंबंधी केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. त्या वक्तव्यानंतर विविध संघटना विरोधात तर काही समर्थनार्थ उभ्या ठाकल्या. 

या वक्तव्यावर अंधश्रद्धा निमूर्लन समितीने तक्रार केली. आरोग्य विभागानेही याची चौकशी केली. परंतु या विरीधात खूप साऱ्या संघटना इंदोरीकर महारांच्या भेटी घेऊन त्यांना समर्थन जाहीर केले.

त्यांना अद्यापर्यंत हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी, मनसे, भाजप या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला आहे.

आता आक्रमक हिंदुत्ववादी ओळख असलेल्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानेही उघडपणे इंदोरीकरांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अनेक संघटना  इंदोरीकरांच्या समर्थनार्थ एकवटल्या असल्याचे चित्र आहे.

हिंदू धर्माचार्यांची वाढती लोकप्रियता ही हिंदू धर्म विरोधकांना खपत नाही. त्यामुळे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून साधुसंतांना त्रास देण्याचे षडयंत्र सध्या धर्मद्वेष्टे मंडळींनी चालवले असल्याचा आरोप करत

हिंदू धर्माला बदनाम करण्याचे उद्योग त्वरित थांबवावे अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय बजरंग दल स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी दिला.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment