आघाडी सरकार फक्त घोषणा करत असून अंमलबजावणी शून्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यास काही मंत्र्यांचा विरोध आहे. हमीभावासाठी दूध उत्पादकांच्या सुरू झालेल्या आत्महत्यांची दखल घेऊन दूध संघानी आपल्या नफ्यातून त्यांना मदत करावी.

सरकारने दूधाला १० रूपये अनुदान तातडीने द्यावे, आशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार विखे म्हणाले,

युती सरकारच्या काळात जी मंडळी दुधाच्या अनुदानासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणा देत होती, आज तीच मंडळी सत्तेत आहेत.

त्यांना आपल्याच घोषणांचा सोयीस्कर विसर पडला आहे. दूध उत्पादकांची मागणी लक्षात घेऊन मागील सरकारने पाच रुपयांचे अनुदान देत त्यासाठी निधीची तरतूद केली.

मग, आताच्या सरकारला अडचण काय आहे? दूध उत्पादकांना हमीभाव आणि अनुदान देण्यास काही मंत्र्यांचा विरोध अाहे. दुधाला भाव मिळत नसल्याने उत्पादकांच्या सुरु झालेल्या आत्महत्या राज्याला शोभणाऱ्या नाहीत.

सरकारने अधिक वेळ न घालवता दूध उत्पादकांना लिटरमागे १० रुपये अनुदान द्यावे. याबाबत निर्णय न झाल्यास भाजप १ ऑगस्टला आंदोलन करेल, असा इशारा विखे यांनी दिला.

आघाडी सरकार फक्त घोषणा करत असून अंमलबजावणी शून्य आहे. सरकार बांधावर खत देणार होते, पण दुकानांतच नाही, बांधावर मिळणार कधीॽ शेतातील काम सोडून शेतकऱ्यांना खतासाठी दुकानांसमोर रांगा लावण्याची वेळ आली.

बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाली. महाबीजकडून फसववणूक व्हावी, हे आश्चर्यकारक आहे. दुबारपेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर असल्याने सरकारने तातडीने मदत जाहीर करण्याची गरज असल्याचे मत आमदार विखे यांनी व्यक्त केले.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment