‘ह्या’ मोठ्या गावात कोरोनाचा शिरकाव,तीन दिवस संपूर्ण लॉकडाऊन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. ग्रामीण भागातही हा आजार फोफावत चालला आहे. राहाता तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही.

तालुक्यातील विविध गावांत कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वात मोठ्या समजल्या जाणार्‍या पुणतांबा गावात कोरोनाने शिरकाव केल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे.

या पार्श्वभूमीवर आजपासून 3 दिवस पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय कोरोना समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती सरपंच डॉ. धनंजय धनवटे व ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी दिली.

काल पुणतांबा येथील शिर्डी रोड व गावातील कोपरगाव रोडलगत असलेल्या मल्हारवाडी भागात सापडलेल्या कोरोना रुग्णांबाबत प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलली असून

मल्हारवाडी भाग शासनाच्या नियमानुसार कन्टेन्मेंट झोन जाहीर केला जाईल. तसेच ज्या रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत

त्या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आरोग्य तपासणी करून अहवाल आल्यानंतर योग्य ती कडक कारवाई करण्याचे सुतोवाच सरपंच डॉ. धनवटे व ग्रामविकास अधिकारी सोमनाथ पटाईत यांनी केले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment