महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,27 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे शेळ्या चारत असलेल्या महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या प्रकरणी प्रकाश सुखदेव सांगळेविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पीडित महिला शेळ्या चारत असताना सांगळेने विनयभंग केला.

माझ्याकडे आली नाहीस, तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकेन, अशी धमकीही दिली. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर सांगळे निघून गेला. पतीने सांगळे यास जाब विचारला असता मला काय विचारतोस, बायकोलाच विचार असे सांगत त्याने शिवीगाळ केली.

महिलेच्या घरासमोर लावण्यात आलेल्या मालवाहू वाहनाच्या काचेवर सांगळेने दगडफेक केली. या प्रकरणाचा तपास कॉन्स्टेबल एस. के. कदम करत आहेत.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment