अहमदनगर ब्रेकिंग : आता तुरुंगातही कोरोनाचा शिरकाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला.

त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. श्रीरामपुरात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा 208 वर जावून पोहोचला आहे.

यामुळे आता सर्वसामान्यांबरोबर प्रशासनाची चिंता वाढली आहे. तालुक्यात नव्याने 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यात शहरातील संजयनगर भागात 2, वॉर्ड नं. 1 मध्ये एक, वॉर्ड नं. 2 एक, वॉर्ड नं. 4 मध्ये चार जण व श्रीरामपूर तुरुंगातील चार आरोपींचा यात समावेश आहे.

हे चार आरोपी वॉर्ड नं. 1 व वॉर्ड नं. 2 मधील प्रत्येकी एक तर संजय नगरमधील दोघांचा समावेश आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाने

आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. प्रशासनाने जनतेला सर्वतोपरी घालून दिलेले नियम पाळावेत असे हवं जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment