क्वारंटाइन केले, तर आत्महत्या करेन उपसरपंचाची धमकी!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या हंगे येथील उपसरपंचाने मला क्वारंटाइन केले, तर आत्महत्या करेन अशी धमकी देत प्रशासनासोबत असहकार पुकारल्यामुळे महसूल प्रशासनापुढे मंगळवारी पेच निर्माण झाला.

पोलिसांना कळवण्यात आल्यानंतरही उपसरपंच व त्यांचे कुटुंबीय उशिरापर्यंत क्वारंटाईन झालेले नव्हते. हंगे येथील वृद्ध महिलेस कोरोना झाल्यामुळे मृत झाली.

या महिलेचा हंगे येथे आलेला जावई पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे प्रशासनाने आजीबाईंच्या घरातील सदस्यांनी घशातील स्त्राव देण्याची सूचना केली. परंतु त्यास या कुटुंबाकडून प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी स्वतः हंगे येथे जाऊन या कुटुंबातील सदस्यांची रॅपिड टेस्ट करण्याची सूचना केली. मृत आजीबाईंचा मुलगा हंगे गावचा उपसरपंच असून प्रशासनास सहकार्यच न करण्याची भूमिका त्यांनी घेतली.

घरात कोरोनाची बाधा असलेल्या जावयाने आरोग्य कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला, तर उपरपंचाने मला जर कॉरंटाईन करण्याचा प्रयत्न केला मी आत्महत्या करेल, दगडाने मारेल अशी धमकीच दिली.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment