धक्कादायक : एकाच कुटुंबात ‘इतक्या’ लोकांना झाला कोरोना !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- नेवासे तालुक्यातील कुकाण्यातील बाधिताच्या कुटुंबातील आणखी सात सदस्य पाॅझिटिव्ह निघाले. शिरसगाव येथील त्यांचा नातलगही बाधित निघाला. 

सोमवारी सायंकाळी जीमचालक बाधित निघाला. त्याचे वडील गेल्या रविवारी बाधित आढळले. कुकाण्यातील ही साखळी तब्बल सात रूग्णांनी वाढली.

गेल्या चार महिन्यांत कुकाण्यात एकही रूग्ण नव्हता, परंतु मागील तीनच दिवसांत रुग्णसंख्येने उसळी घेतली. जीममध्ये व्यायामासाठी येऊन गेलेल्या पन्नासहून अधिक जणांचा आता आरोग्य व पोलिस यंत्रणा शोध घेत आहे.

प्रथम नेवासेफाट्यावरील रूग्णाच्या संपर्कातील एकास काेरोनाची बाधा झाली. या कुटुंबीयांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. कुकाण्यातील एक वृद्ध बाधित निघाला. त्याने एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले होते. जिल्हा रूग्णालयात त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment