पोलिस कोठडीतील तब्बल २२ कैदी पाॅझिटिव्ह !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- नेवासे तहसीलच्या आवारात असलेल्या पोलिस कोठडीतील तब्बल २२ कैदी गुरुवारी पाॅझिटिव्ह आढळले. जूनपर्यंत केवळ सात पॉझिटिव्ह असलेल्या तालुक्यात जुलैअखेरीस दीडशेपर्यंत रुग्ण वाढलो.

खेड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला असताना तब्बल १०१ दिवसांनी नेवासे शहरात रुग्ण सापडले. त्यात नगरसेवक, तसेच शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

न्यायालयाच्या आवारात रुग्ण सापडल्याने न्यायालयाचा परिसर ओस पडला होता. दरम्यान, सोनई येथील तपासणी झालेले सर्व रुग्ण निगेटिव्ह आल्यानंतर आनंद व्यक्त होत असतानाच शासकीय कर्मचारी पॉझिटिव्ह निष्पन्न झाले.

त्याबरोबर एक आरोपीही पॉझिटिव्ह आला. हा आरोपी नेवासे कारागृहात आणला होता. गुरुवारी कारागृहातील इतर कैदी तपासले नंतर २२ जण पाॅझिटिव्ह आढळले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment