अहमदनगर ब्रेकिंग: ‘ह्या’ तालुक्यात ढगफुटी; पाण्याचे थैमान, शेत, रस्ते गेले वाहून

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी पहाटे पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरात शुक्रवारी पहाटे ढगफुटी सदृश पाऊस झाला.

या जोरदार पावसामुळे अमरापूर कर्जत रोड वरील रस्ते, पूल वाहून गेले असून बरीचशी शेतीही पाण्याखाली गेली आहे. या कोसळलेल्या अस्मानी संकटाने बळीराजा हवालदिल झाला आहे.

अमरापूर कर्जत महामार्गावरील रस्त्याचे व पुलाचे काम अर्धवट असल्याने रस्त्याच्या कामाकरता नदीपात्रात घातलेल्या मातीच्या मोठ्या भरावाने नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलून नदी काठच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले.

यामुळे परिसरातील कापूस, बाजरी, मुग, भुईमूग आदी पिके पाण्याखाली जावून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी अतिवृष्टीच्या अस्मानी संकटामुळे कोसळला आहे.

परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या उभ्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले.

तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment