पारनेर तालुक्यात गुरुवारी आठ कोरोना पॉझिटिव्ह

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे.

पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. गुरुवारी दिवसभरात आठ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

या आठ जणांमध्ये कान्हूरपठार गावचे तीन, पाडळी दर्या दोन, सुपा एक, ढवळपुरी एक व टाकळी ढोकेश्वर एक अशा रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यानी दिली.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी रुग्णंच्या संपर्कातील 100 मीटरचा परीसर सील करण्याचे आदेश दिले आहेत. पारनेर तालुक्यात 41 अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण असून 22 तपासणी अहवालाची प्रतीक्षा होती.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment