मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आ.रोहित पवार सरसावले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. अहमदनगरमध्येही कोरोनाने उग्र रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे.

परंतु या प्रसंगात कोरोनाला घाबरून घरात न बसता जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. रोहित पवार हे मतदार संघात फिरत आहेत. थेट जनसामान्यांच्या प्रश्नांना भिडत आहेत.

मतदारसंघातील कुकडी व सीना धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणुन घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी आठवड्यापूर्वी मतदारसंघातील रुईगव्हाण,

कुळधरण, राक्षसवाडी, बारडगाव दगडी, पिंपळवाडी, करमनवाडी, करपडी, परीटवाडी, चिलवडी, राशीन, सोनाळवाडी, कोळवडी, अळसुंदे, धांडे वाडी, आंबीजळगाव, म्हाळंगी, लोणी मसदपुर, कोरेगाव, दिघी,

निमगाव-डाकु, घुमरी, कोकणगाव, नागलवाडी, नवसरवाडी, माही, मलठन आदी गावात अधिकाऱ्यांसमवेत दोन दिवसीय दौरा केला होता.

याच अनुषंगाने आ.पवार यांनी शेतकऱ्यांचे उर्वरीत प्रश्न सोडवण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी व कुकडी विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत धुमाळ

यांच्या समवेत पुणे येथील सिंचन भवनात नुकतीच आढावा बैठक घेतली. पाणी नियोजन, भूसंपादन, चाऱ्याची दुरुस्ती आदी महत्वाच्या असलेले विषय सोडवत असताना अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेले हे विषय मार्गीही लागले आहेत.

कोरोनाचे संकट आहेच. ते आणखी वाढतेय. पण म्हणून इतर प्रश्न संपलेत असे नाही. ग्रामीण भागात तर कोरोनापेक्षाही हे प्रश्न ग्रामस्थांना अधिक गंभीर वाटतात.

कोरोनाच्या उपाययोजनांत गुंतलेल्या यंत्रणेचे या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत कर्जत-जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार मतदारसंघात फिरून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail

Leave a Comment