अबब! संगमनेर @ ७२८; नव्याने चार पोलिसांसह 26 लोकांना कोरोना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. यात संगमनेर तालुक्यातील रुग्ण सर्वाधिक आहेत. संगमनेरमध्ये जणू कोरोनाचा विस्फोटचं झाला आहे.

काल दिवसभरात संगमनेर तालुक्यात २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यात ४ पोलिसांचाही समावेश आहे. तालुक्यातील करोनाबाधीतांची संख्या 728 वर जाऊन पोहोचली आहे.

काल आढळलेल्या २६ रुग्णांपैकी जनतानगर येथील 31 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 39 वर्षीय पुरुष, पोलीस कॉलनीतील 26 वर्षीय महिला, जनतानगर येथील 31 वर्षीय महिला अशा ४ पोलिसांचा समावेश आहे.

तर उर्वरित रुग्णांमध्ये आंबी खालसा येथील 43 वर्षीय पुरुष, निंबाळे येथील 42 वर्षीय पुरुष, संगमनेरातील रंगारगल्ली येथील 62 वर्षीय महिला, 29 वर्षीय महिला, 9 वर्षीय मुलगा, 5 महिन्याची बालिका, 6 महिन्याची मुलगी,

27 वर्षीय तरुण, माळीवाडा येथील 32 वर्षीय पुरुष, 2 वर्षीय मुलगी, मालदाड रोड येथील 30 वर्षीय महिला, पदमानगर येथील 45 वर्षीय पुरुष, कनोली येथील 54 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथील 60 वर्षीय पुरुष,

तर पोलीस कर्मचार्‍यांच्या तपासणीमधील जनतानगर येथील 31 वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथील 39 वर्षीय पुरुष, पोलीस कॉलनीतील 26 वर्षीय महिला, जनतानगर येथील 31 वर्षीय महिला,

देवाचा मळा येथील 30 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, 7 वर्षीय मुलगी, आश्वी बुद्रूक येथील 27 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 9 वर्षीय मुलगी, 30 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, चिकणी येथील 28 वर्षीय पुरुष,

महात्मा फुले नगर येथील 29 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात झाली आहे.

प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. प्रशासनाने जनतेला सर्वतोपरी घालून दिलेले नियम पाळावेत असे हवं जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment