Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : ३५ वर्षीय मनपा कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- पुण्यात उपचार घेत असलेल्या ३५ वर्षीय मनपा कर्मचाऱ्याचा शुक्रवारी मृत्यू झाला.

त्यानंतर कामगार युनियनने आयुक्त श्रीकांत मायकलवार व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कर्मचाऱ्यांची सरसकट तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

शहरातील रुग्णांचा आकडा दीड हजारांवर गेला आहे. मनपातील एका अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वी बाधा झाल्याचे समोर आले. युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी त्याच वेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीची मागणी केली होती.

युनियनने एक दिवस काम बंदचे हत्यारही उपसले होते. त्यानंतर प्रशासनाने मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची तपासणी केली, परंतु सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी झालेली नाही.

Advertisement

कोरोनाबाधित कर्मचाऱ्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दहा दिवसांपूर्वी त्याला पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

मृताच्या वारसाला नोकरीत घेऊन ५० लाखांची भरपाई द्यावी, अशी मागणी युनियनने केली आहे. कामगारांसाठी किमान पन्नास खाटांचे स्वतंत्र केंद्र असावे, अशीही मागणी करण्यात आली.

Advertisement
      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Advertisement
Advertisement
li