अहमदनगर ब्रेकिंग : राम शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

file photo

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- माजीमंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह माजीमंत्री राम शिंदे यांच्यावरही जमावबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे दूध आंदोलन केल्याप्रकरणी भाजपाचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह ३५ जणांविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

माहिजळगाव चौक ता.कर्जत येथे राम शंकर शिंदे रा.चौंडी ता. जामखेड यांचे अध्यक्षतेखाली राज्य सरकारी शेतकऱ्याना दुधाला भाव वाढुन द्यावा या करीता माहिजळगाव या ठिकाणी आंदोलनाची कोणतीही परवानगी नसताना जिल्हाधिकारी यांच्याआदेशाचे उल्लंघन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर आदी ठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे उभे राहणे , थांबुन राहणे, रेंगाळणे व सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील. असा आदेश असतानी राम शिंदे यांनी रस्ता अडवुन वाहतुकीस अडथळा निर्माण करुन वाहतुक थांबवली.

Advertisement

दुध ओतुन कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होईल याची जाणीव असताना भाजपाच्या या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

Advertisement

[email protected]

Advertisement