Breaking News Updates Of Ahmednagar

‘तो’ खूनच; पारनेर पोलिसांनी लावला छडा !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील गवळीबाबा देवस्थानजवळ मृतदेह आढळून आला होता. पारनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

तदनंतर मृताची पत्नी जनाबाई राघू कोकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

Advertisement

पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस स्टेशनचे सपोनी राजेश गवळी यांनी तपासाची चक्रे फिरवली.

तपासाअंती राघू कोकरे याच्याबाबत सुरेश उर्फ सहादू राजाराम खताळ (वय 32, रा. ढवळपुरी, ता. पारनेर) याच्या मनात राग होता, असे पुढे आले. त्यानुसार आरोपीस 29 जुलै रोजी अटक करण्यात आली.

Advertisement

त्याची चौकशी केली असता त्याने त्याचा भाऊ संतोष उर्फ लालू राजाराम खताळ यास गुन्ह्यात निष्पन्न करून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील

Advertisement

यांच्या सूचनेप्रमाणे सपोनि राजेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक पद्मने व बोकील, पोहेकॉ शेळके, पोलीस ना. खाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

Advertisement

ahmednagarlive24@gmail.com

Advertisement
Advertisement
li