अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. आता नेवासे तालुक्यातही अनेक रुग्ण सापडले आहेत.

मागील चार महिन्यात शहरात अवघे चार रुग्ण आढळून आले होते. मात्र आता याच आठवड्यात जास्त प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत.

शहरात सुरू असलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये म्हणून शहरातील जनतेला नियम पाळण्याचे आवाहन काही नगरसेवकांनी सोशल मिडियाद्वारे केले आहे.

नेवासा शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली असून शुक्रवारी दुपारनंतर शहरातील अनेक नगरसेवकांनी नेवासा शहरातील नागरिकांना काम असेल तरच बाहेर पडा,

तोंडाला मास्क लावा, व्यापाऱ्यांनी दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, नियमाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

अन्यथा नेवासा शहर बंद करण्याची वेळ आपल्यावर ओढवणार असल्याचा दावा सोशल मिडियाद्वारे केले जात आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment