ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

खासदार लोखंडे म्हणतात, आम्ही चार बायकाही सांभाळू शकतो

0

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- दूध आंदोलनावरून आता राजकारण तापू लागले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. खा. लोखंडे यांनी  ‘ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो,’ असं जहरी उत्तर माजी मंत्री राम शिंदे यांना दिलं आहे.

दूध दरासाठी भाजपनं आज पुकारलेल्या आंदोलनात माजी मंत्री व भाजपचे नेते प्रा. राम शिंदे यांनीही सहभाग घेतला होता. आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली होती.

Advertisement

शेतकरी रस्त्यावर आला आहे, वीज बिल अवाजवी देण्यात आली आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकर्‍याला मदत करायला तयार नाही. हे सरकार तिघाडी सरकार असून एका नवर्‍याच्या दोन बायका अशी या सरकारची अवस्था आहे अशी बोचरी टीका राम शिंदे यांनी केली होती.

टीकेचा हाच धागा पकडत खा. शिवाजी लोखंडे यांनी राम शिंदे यांना प्रतिउत्तर दिले आहे. खासदार लोखंडे हे एका कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Advertisement

त्यावेळी त्यांनी राम शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘ज्या नवऱ्यामध्ये बायका सांभाळण्याची ताकद असते, तो दोनच काय चार बायकाही सांभाळू शकतो. आमचे नेतेही त्या ताकदीचे आहेत, असं खा. लोखंडे म्हणाले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

Advertisement

ahmednagarlive24@gmail.com

Advertisement
li