शिर्डी साई संस्थानचा तात्पुरता कार्यभार ठाकरे यांच्याकडे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- शिर्डी साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली.

राज्य शासनाने ठाकरे यांना संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याबरोबरच पुढील आयएएस दर्जाच्या अधिकारी नियुक्त हाेईपर्यंत किंवा पुढील आदेश होईपर्यंत संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याचेही निर्देश दिले आहेत.

उपजिल्हाधिकारी असलेले रवींद्र ठाकरे दोन वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. नुकताच त्यांचा कार्यकाळ संपला होता.

मुदतवाढीसाठी त्यांची फाइल मंत्रालयात प्रलंबित होती.दरम्यानच्या काळात संस्थानचे सीईओ अरुण डोंगरे यांची बदली झाल्याने त्यांचा पदभार मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. शासन आदेशाने व ठाकरे यांच्या मुदतवाढीमुळे शुक्रवारी घोरपडे यांनी ठाकरे यांच्याकडे सीईओपदाचा कार्यभार हस्तांतरित केला.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment