चिंताजनक! आता अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या ‘या’ शाखेतही कोरोनाचा शिरकाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला फास आवळायला सुरुवात केली आहे. जवळपास अहमदनगर जिल्ह्यात ३ हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

विविध शासकीय कार्यालयांत कोरोनाने एंट्री केल्यानंतर आता पोलीस यंत्रणेलादेखील कोरोनाने आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे.

एका उपनिरीक्षकासह जिल्हा पोलीस दलातील 14 जणांना कोरोनाने बाधित केल्याची घटना ताजी असतानाच आता स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) 13 पोलिसांना कोरोना झाल्याचे वृत्त आले आहे.

याआधी पोलीस मुख्यालय, शहर पोलीस दल, शीघ्र कृती दलातही करोनाने शिरकाव केला आहे. गुन्हेगारांना अटक करण्यासाठी, अवैध धंद्यावर छापे टाकण्यासाठी गुन्हे शाखेच्या (एलसीबी) या कर्मचार्‍यांचा जिल्हाभर वावर असतो.

यामुळे गुन्हे शाखेच्या 13 पोलीस कर्मचार्‍यांना लागण झाली आहे. त्रास होऊ लागल्याने गुरूवारी व शुक्रवारी या कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली होती.

या तपासणी दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर पारनेर येथील कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

अहमदनगरमध्ये कोरोना संक्रमणाचा वेग वाढतच चालला आहे. या काळामध्ये पोलिस प्रशासन कोरोनायोध्याची भूमिका खूप शानदार पार पाडत आहेत. परंतु या दरम्यान पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाबाधित झाले आहेत.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment