Breaking News Updates Of Ahmednagar

रक्षाबंधनाच्या आधीच अहमदनगर जिल्ह्यात ह्रदय हेलावुन टाकणारी दुदैवी घटना..

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-  ह्रदय हेलावुन टाकणारी दुदैवी घटना जामखेड तालुक्यात घडली आहे,रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीच  आईसह तीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे एका महिलेसह तीन मुलींचा विहीरीत मृतदेह आढळून आला आहे. अद्याप कारण मात्र समजू शकले नाही. मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

Advertisement

आतापर्यंन्त दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील भोगलवाडी शिवारात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका महीलेस तीच्या तीन मुलींचा मृतदेह विहीरीतील पाण्यात अढळुन आला.

मात्र घटना नेमकी कशा मुळे घडली हे अद्याप समजु शकले नाही. घटनेची माहिती मिळताच कुसडगाव येथील सरपंच हवा सरनोबत, पोलीस पाटील निलेश वाघ माजी पंचायत समिती सदस्य शरद कार्ले यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Advertisement

आईसह तीन मुलींचे मृतदेह विहिरीत आढळुन आल्याने कुसडगाव परिसरसह जामखेड तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

यामध्ये मयताची नावे स्वाती राम कार्ले (वय ३० आई), कोमल राम कार्ले (वय ६ मुलगी), सायली राम कार्ले (वय ९ मुलगी), अंजली राम कार्ले (वय ११ मुलगी) असे आहे.

Advertisement
      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Advertisement
Advertisement
li