कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाची लागण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-अकेाले तालुक्यात शनिवारी ९ पॅाझिटिव्ह आढळल्याने रुग्णांची एकूण संंख्या १३० झाली आहे. कारखाना रोड परिसरातील ५० वर्षीय व्यक्तीचा खासगी प्रयोगशाळेतील अहवाल पॅाझिटीव्ह आला.

काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीला पुन्हा बाधा झाली आहे. शेरणखेल येथे ४, रेडे येथील ३, टाहाकारी व कारखाना रोड प्रत्येकी १ असा ९ जणांचा अहवाल पॅाझिटिव्ह आला.

शेरणखेल येथील ५६ वर्षीय व ४५ वर्षीय पुरुष व ५२ वर्षीय महिलेस, ४० वर्षीय महिला असे ४, तर रेडे येथील ५६ व २५ वर्षीय महिला व ४ वर्षीय बालिका यांच नगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील अहवाल पॅाझिटिव्ह आला.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment