Ahmednagar NewsAhmednagar NorthCorona Virus Marathi News

‘जनतेने सतर्क होत कोरोनाचा नायनाट करावा’

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जवळपास पाच हजरांचा रुग्ण संख्येचा टप्पा अहमदनगरने पार केला आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, कोरोना या संसर्ग महामारीचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद द्यावा.

प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेनेच आता सतर्क व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. एका कार्यक्रमात खासदार लोखंडे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, शासनाच्या आवाहनाला जनतेकडून प्रतिसाद मिळत नाही.

सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी होत आसल्याने संसर्ग वाढत चालला आहे . कोरोना या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे.

जनतेने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन दक्षता घेतल्यास कोरोना हद्दपार होईल. त्यासाठी जनतेकडून योग्य प्रतिसाद अपेक्षित आहे, असे खासदार लोखंडे म्हणाले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button