Breaking News Updates Of Ahmednagar

सराईत गुन्हेगाराने पोलिसाला चावा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि…

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :-संगमनेर तालुक्यात अनेक गुन्ह्यात फरार असलेला साकूर-माळवाडी येथील सराईत गुन्हेगाराने पोलिसाला चावा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत त्याला गजाआड केले. ही घटना शुक्रवारी पहाटे साकूर-माळवाडी येथे घडली. नवनाथ विजय पवार असे त्याचे नाव आहे.

Advertisement

जुन्नर, मंचर, आळेफाटा पोलिस हद्दीत अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या पवारला ताब्यात घेण्यासाठी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र आप्पा मांजरे गेले

असता त्याच्याशी झटपट करत पवारने छातीला चावा घेत पळून गेला. तो साकूर-माळवाडी येथे घरी असल्याची खबर मांजरे याना मिळाली होती.

Advertisement
      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Advertisement
Advertisement
li