Breaking News Updates Of Ahmednagar

माजी आमदार म्हणतात , निद्रिस्त सरकारला जाग आणण्यासाठी लढत राहणार

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

त्यामुळे दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी दूध उत्पादकांनी एक ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. कोपरगाव मतदारसंघातील सुमारे ७८ दूध संकलन केंद्रावर शनिवारी आंदोलन करण्यात आले.

Advertisement

चांदेकसारे येथे झालेल्या आंदोलनाप्रसंगी बोलताना भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

या निद्रिस्त सरकारला आता जाग आणण्याची गरज आहे. असे सांगून त्यांनी जोपर्यंत शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना रास्त भाव मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा चालूच राहील, असा इशाराही दिला.

Advertisement

यावेळी भाजपचे निरीक्षकनितीन कापसे, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शहराध्यक्ष कैलास खैरे, केशव भवर,संचालक संजय होन, रिपाइंचे दीपक गायकवाड, रासपचे राजेंद्र जानराव, संदीप कांदळकर, विलास होन, हरिभाऊ गिरमे,

चंद्रकांत औताडे, अप्पासाहेब औताडे, अॅड. ज्ञानेश्वर होन, धनंजय माळी, गणेश राऊत, रमेश औताडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी सरपंच केशव होन यांनी केले.

Advertisement
      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Advertisement
Advertisement
li