…तर खासदार सुजय विखे पाटील देणार खासदारकीचा राजीनामा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

मात्र प्रशासनाकडून विश्वासात घेतले जात नाही. प्रशासन विश्वासात घेत नसेल तर मी खासदारकीचा राजीनामा देतो, असे वक्तव्य खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले आहे.

विकासवर्धिनी संस्थेच्या वतीने आयोजित ऑनलाईन नागरी संवाद या कार्यक्रमात खासदार विखे बोलत होते. डॉ. सुजय विखे यांनी जिल्हाधिका-यांच्या कारभारावर यावेळी टीका केली.

हे आहेत खासदार सुजय विखे पाटील यांचे आरोप 

  • केंद्र शासनाकडून १८ कोटी रुपयांचा निधी मिळाला.
  • यापैकी चार कोटी रुपये नवीन कर्मचा-यांची भरती करण्यासाठी
  • मात्र आतापर्यंत एकाही कर्मचा-यांची भरती नाही
  •  उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत.
  • जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेतले जात नाही

 

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment