माजी आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्षांसह ५० जणांवर गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

त्यामुळे विविध मागण्या घेऊन दूध आंदोलन प्रश्नी अकोले तालुक्यात भाजपच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रकरणी माजी आमदार वैभव पिचड,

जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, ज्येष्ठ नेते मधुकर नवले आदींसह विविध 50 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पो. कॉ. सुरेश घनश्याम पवार यांच्या फिर्यादी वरून भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम नथुजी भांगरे, विठ्ठल शिवराम कानवडे, सत्यवान भिवसेन कानवडे यांचेसह अन्य 15 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तर अकोले येथे करण्यात आलेल्या आंदोलन प्रकरणी पो. कॉ. चारुशीला अंबादास गोणके यांच्या फिर्यादीवरून संभाजी ब्रिगेडचे नेते डॉ. संदीप वसंतराव कडलग,

युवा स्वाभिमान संघटनेचे संस्थापक महेश रमेश नवले, अध्यक्ष सुरेश नानाभाऊ नवले, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. शांताराम नामदेव वाळुंज, कॉ. कारभारी शंकर उगले,

किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस व शेतकरी नेते डॉ. अजित सुभाष नवले यांचेसह अन्य 8 कार्यकर्त्यांविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

भाजपच्या वतीने येथील सिद्धेश्वर दूध संस्थेसमोर करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी माजी आमदार वैभव मधुकर पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम कोंडाजी गायकर, सिद्धेश्वर दूध संस्थेचे चेअरमन संदीप किसनराव शेटे,

उपाध्यक्ष अनिल जनार्दन गायकवाड, अमृतसागर दूध संघाचे संचालक भाउपाटील भिमाजी नवले, प्रवीण तात्याबा धुमाळ, गोरक्ष गणपत मालुंजकर, ज्येष्ठ नेते मधुकर लक्ष्मण नवले,

बुवासाहेब मल्टिस्टेटचे संचालक रमेश काशीनाथ नाईकवाडी यांचेसह अन्य सात ते आठ अशा सुमारे 50 कार्यकर्त्यां विरुद्ध हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment