Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingCorona Virus Marathi NewsMaharashtra

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ४३५ नवे रुग्ण, वाचा दिवसभरातील अपडेट

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४३५ ने वाढ झाली.

यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३ ,अँटीजेन चाचणीत १९४ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १९८ रुग्णांचा समावेश आहे.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२४३ इतकी झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आज २६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४०२५ इतकी झाली.

काल सायंकाळपासून आज सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४३ रुग्ण बाधित आढळून आले बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २८, संगमनेर ०२, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०३, कॅन्टोन्मेंट ०३, पारनेर ०३, शेवगाव ०१, कोपरगाव ०१ आणि जामखेड येथील ०१ रुग्ण यांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १९४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ५४, संगमनेर १२, राहाता २१, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०८, श्रीगोंदा १७, पारनेर ०८, शेवगाव २९, कोपरगाव २६, जामखेड ०६ आणि कर्जत ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १९८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १६४, संगमनेर ०८, राहाता ०१, पाथर्डी ०७, नगर ग्रामीण ०६, श्रीरामपूर ०१, पारनेर ०२ अकोले ०१, राहुरी ०१, शेवगाव ०१, कोपरगांव ०१ आणि कर्जत येथील ०५ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण २६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. मनपा ११३,संगमनेर ५५, राहाता १०, पाथर्डी १८,नगर ग्रा.३,श्रीरामपूर ८, कॅन्टोन्मेंट ३, नेवासा ४, श्रीगोंदा ५, अकोले १८, राहुरी २, कोपरगाव ७, जामखेड १, कर्जत ११,
इतर जिल्हा ५

  • बरे झालेली रुग्ण संख्या: ४०२५
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: २२४३
  • मृत्यू: ७८
  • एकूण रूग्ण संख्या: ६३४६

 

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button