Ahmednagar News

सततच्या पावसाने बळीराजाच्या पदरी निराशा; उपसभापती म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे.

अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सततच्या या पावसाने तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पदरी याही वर्षी निराशाच पडली आहे. जून, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीप पिकांची चांगलीच दाणादाण उडाली.

मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. या पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने कुठे शेतात पाणी साचले.

तर कुठे बाजरी पीक भूईसपाट झाले. परिसरातील बाजरी, भुईमूग, मका, ऊस, जनावरांचा चारा आदी पिकांमध्ये पाणी साचले. त्यामुळे शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

या नुकसानीचे महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करून तात्काळ भरपाई मिळण्याची मागणी तालुक्यातील शेतकर्‍यांमधून होत आहे.

अहमदनगर तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे साकत खुर्द, वाळकी, भोरवाडी, वाटेफळ, दहिगाव, वडगाव तांदळी, रुईछत्तीसी आदी भागांत शेतामध्ये पाणी साचून कपाशी,

मका, बाजरी, मूग, कांदा, भुईमूग आदी उभ्या पिकांची नासाडी झाली आहे तर शुक्रवारी (दि. 31) विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे दहिगाव, साकत या ठिकाणी मका पिके भुईसपाट झाली आहेत.

सलग तीन चार वर्षांपासून पडलेला दुष्काळ, यातच कोरोना महामारीचे संकट यामध्ये शेतकरी आधीच भरडला असताना याही वर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र भापकर म्हणाले की, सलग दोन तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शनिवार, रविवार सोमवार सलग सुट्या असल्यामुळे सध्या अडचण येत असून मंगळवारी यासंदर्भात तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close