Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingMaharashtra

चमत्कार ??? साई समाधी मंदिराच्या तळघरातून बाहेर पडतेय असे काही…

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- पावसामुळे साईसमाधी मंदिरात समाधीलगत असलेल्या तळघरात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर पाणी झिरपत आहे़

मंदिर बंदमुळे अगोदरच आर्थिक समस्येचा सामना करीत असलेल्या साईसंस्थानची या झिरपणा-या पाण्याने चिंता वाढवली आहे़.

एका ठिकाणी पाणी बंद केल्यानंतर अन्य ठिकाणातून पाणी निघत आहे़ रोज जवळपास पाचशे लिटर पाणी बाहेर पडत आहे़. संस्थानच्यावतीने सदरचे पाणी बंद करण्यासाठी केमिकलच्या सहाय्याने तसेच अन्य उपाययोजना सुरू आहे.

साई मंदिरालगत असलेल्या तळघरात मागील आठवड्यापासून अचानक पाणी झिरपण्यास सुरुवात झाली आहे. समाधी चौथऱ्यावरील साईबाबांच्या मूर्तीच्या डाव्या बाजूने समोरून येणाऱ्या दर्शन रांगेखाली या तळघरात उतरण्यास दरवाजा आहे़

दर्शनरांगेतील या स्टीलच्या दरवाजावर पाय देवून भक्तांची रांग पुढे सरकत असते़ दर्शनरांग बंद असतांना हा दरवाजा उघडून पायºया उतरून तळघरात जाता येते़ मंदिराच्या जमिनीखालील भागात समाधी चौथर्यालगत उत्तर बाजूला दोन तळघरे आहे़

यात दैनंदिन वापराची साईमूर्तीची आभूषणे व पूजेच्या मौल्यवान वस्तू ठेवलेल्या असतात़ शंभर वर्षापूर्वी वाडा बांधताना बुटींनी मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठीच हे तळघर बनवल्याचे दिसते़ सध्या याच तळघरात समाधी कडील भिंती, पाय-यांमधून पाणी पाझरत आहे़.

दरम्यान पावसाचे पाणी पाझरत असावे असा प्राथमिक अंदाज संस्थानच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला असला तरीसुद्धा अनेक मोठमोठे पावसाळे झाले त्यावेळी तर गोदावरीश अन्य नद्यांना खूप पूरही आले. यावेळी पावसाचे पाणी अनेक ठिकाणी शिरले होते.

लेंडी नाल्याला देखील पूर आला होता, शहरातील अनेक भागात पाणी साचले त्यावेळी मात्र असा प्रकार कधीच बघायला मिळाला नाही. मात्र मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे, साई मंदिर बंद आहे, सरासरी प्रमाणे पर्जन्यवृष्टी झाली आहे.

असे असताना ही परिस्थिती अचानकपणे कशी उद्भवू शकते असा प्रश्न अनेक साईभक्तांना भेडसावत असून याबाबत शहरातील ग्रामस्थांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button