गर्दी टाळण्यासाठी ‘बंद’चे नियोजन करण्यासाठीच खूप मोठी गर्दी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संगमनेर पाठोपाठ श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे.

तालुक्यातील कारेगाव येथे आज एकाच ठिकाणी सात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने सगळ्यांचीच भीतीने गाळण उडाली.

प्रशासनाच्या सर्वच अधिकार्‍यांनी गावात भेट दिली. यावेळी खबरादि म्हणून आणि गर्दी होऊन संपर्क येऊ नये म्हणून गाव बंद करण्याची हाक गावातील अनेक पदाधिकार्‍यांनी दिली.

मात्र याचवेळी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र जमत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित राजकीय पक्ष नेत्यांनी भाषण करण्याचीही संधी सोडली नाही.

संपर्क टाळण्यासाठी, गर्दी टाळण्यासाठी ‘बंद’चे नियोजन खूप मोठ्या गर्दीत झाल्याचे विरोधाभासाची चित्र यावेळी पाहायला मिळाले. सरपंच पती राजेंद्र उंडे गर्दीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत होते.

कोणी कुणाचे ऐकत नव्हते. यावेळी माजी सभापती दीपकराव पटारे यांनी माईकचा ताबा घेत सर्व गावकर्‍यांचे मत आवाजी मताने घेऊन

कारेगाव व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष नितीन पटारे यांनी स्वयंस्फूर्तिने सर्व व्यावसायिक तीन दिवस बंद पाळतील, असे सांगितले आणि गावात भरलेला माणसांची गर्दी अखेर पांगली. गर्दी टाळण्यासाठी ‘बंद’चे नियोजन खूप मोठ्या गर्दीत पार पडले.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment