Ahmednagar NewsAhmednagar NorthBreakingSpacial

नशिबी मुलगा नसल्याने आठ लेकीनेच पित्याला दिला अग्नीमुख !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :-मुळचे तालुका अकोले, कळस येथिल रहिवासी असलेले तीस ते पस्तीस वर्षेपासून सध्या वास्तव्यास राहणार्‍या श्रीरामपूर तालूका बेलापूर (सुभाषवाडी,ऐनतपूर) येथिल रहिवाशी गणपत धोंडीबा वाघमारे (वय६८) यांचे नुकतेच अचानक पोटात दुखू लागल्याने त्यांना श्रीरामपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांची रूग्णालयात उपचार सुरू असतानाच दु:खद निधन झाले.यांच्या पश्चात पत्नी, आठ विवाहीत मुली, असा परिवार आहे नशिबी मुलगा नसल्याने त्यांची पूर्वीपासूनच मुलीनीचे खांदा व अग्नीमुख द्यावा अशीच त्यांची इच्छा होती बालपणापासून येथिल बेलापूरचे रहिवाशी गणपत टेकाडे मामानी त्यांना साथ दिली.

गणपत वाघमारे हे मनमिळाऊ,कष्टाळू, प्रेमळ स्वभावचे होते त्यांच्या निधनाने बेलापूरात सुभाषवाडीत हळहळ व्यक्त होत आहे. सन, १९७२ च्या दुष्काळात ते ता.अकोले, कळस सोडून बेलापूरात सुभाषवाडीत स्थाईक झाले होते. त्यांना शेती नव्हती. आपला उदरनिर्वाह चालवतात पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते कामधंदा करत होते

त्यांची गरीब हलाखीची परिस्थिती होती हातावर काम करून घर चालवत होते गरीब परिस्थितीतून आठ मुलीचे लग्न केले यातुन घरकाम करून आपला संसार मांडला होता त्यांना मुलगा नशिबाने नसल्यामुळे आठ मुलीनेच पित्याला खांदा लावून अग्नीमुख दिला आहे.

त्यांच्या जन्याने वाघमारे कुटुंबावर दु:खचा डोंगर कोसळला आहेत नशिबानं मुलगा नसल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडली होती त्यातच आठ मुलीचे लग्न करून दिले होते मुलीही त्यांच्यात संसारातच सुखी झाल्या होत्या.

मुलीनाही अकोले तालुक्यातच दिल्या होत्या अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार बेलापूरात अमरधामात करण्यात आले त्यांच्या अकाली निधनाने बेलापूर सुभाषवाडीत हळहळ व्यक्त होत आहेत.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button